जळगाव । भारतीय जनता पार्टी जिल्हा महानगर अंतर्गत महानगर ओबीसी मोर्चाची बैठक प्रदेश सरचिटणीस अजय भोळे व प्रदेश चिटणीस डॉ. विजय धांडे व उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. प्रास्ताविक महानगर जिल्हाध्यक्ष केशव नारखेडे यांनी केले. बैठकीला प्रदेश चिटणीस डॉ. विजय धांडे यांनी ओबीसी बद्दल सखोल माहिती देवून मार्गदर्शन केले.
याचप्रमाणे ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी यांचा 7 जुन मध्ये होणार्या जळगाव जिल्हा नेरी ता. जामनेर व बोदवड येथील नियोजित कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी बैठकीतमध्ये भाजपचे गटनेते नगरसेवक सुनिल माळी ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय चौधरी व जिल्हा सरचिटणीस महेश जोशी, जिल्हा कार्यालयीन मंत्री नितीन गायकवाड व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर, यांनी सदर बैठकीमध्ये मार्गदर्शन केले. बैठकीत उपस्थिती असलेले कार्यकर्ते योगेश पाटील, सरचिटणीस ओबीसी सल्लागार सचिन जांगडा, ज्येष्ठ सल्लागार सुरेश पाटील, चंदु महाले, शिवदास शिंपी, योगराज पाटील, विशाल सोनार, सुरेश राजपूत, राजेंद्र पाटील, वैभम मधुकर, सोनार, आप्पा सोनवणे, नाना सदशिव वाघ, रोहीत जगदाळे, संदीप सुरवाडे, आकाश सपकाळे, धनपत जांगिड, प्रशांत पाटील आदी मान्यवर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. व कार्यक्रमाचे शेवटी आलेल्या पाहुण्याचे व प्रमुख नेत्यांचे व उपस्थितांचे आभार जिल्हा सरचिटणीस गणेश वाणी यांनी आभार मानले.