एरंडोल । केंद्र व राज्य शासनाने ओ.बी.सी.समाजासाठी विविध योजना सुरु केल्या असुन सर्व कार्यकर्त्यांनी या योजनांची माहिती देवून समाजात जनजागृती करावी असे आवाहन भाजपाचे विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर यांनी केले.भाजप ओ.बी.सी.मोर्चाच्या जिल्हा पदाधिका-यांच्या बैठकीत ते बोलत होते.ओ.बी.सी.मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी अध्यक्षस्थानी होते.
संघटन मजबूत करण्याचे केले आवाहन
यावेळी किशोर काळकर यांनी ओ.बी.सी.समाजाचे संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.ओ.बी.सी.समाजासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत, मात्र त्याची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे सांगितले. सर्व समाजाला संघटीत करण्याचे आवाहन त्यांनी केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केंद्र व राज सरकारने ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय सुरु करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. प्रत्येक कार्यकर्त्याने शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देवून जनजागृती करावी असे सांगितले. विरोधक ओ.बी.सी.समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ओ.बी.सी.मोर्चाचे सरचिटणीस अजय भोळे यांनी यांनी भाजपतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यशस्वितेसाठी यांचे परिश्रम
ओ.बी.सी.मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांनी आगामी काळात जिल्ह्यात प्रत्येक गावात शाखा स्थापन करून पक्ष संघटन मजबूत करणार असल्याचे सांगितले. पुढील वर्षी होणार्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे आवाहन केले. प्रदेश चिटणीस डॉ.विजय धांडे यांनी प्रास्तविक केले. तालुकाध्यक्ष छाबुनाना चौधरी यांनी आभार मानले. बैठकीस विभागीय अध्यक्ष प्रदीप पाटील यांचेसह सर्व मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.