जळगाव : ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय असावे ही मागणी अनेक वर्षापासून होती. ओबीसी समाजात सर्वात जास्त जातीचा समावेश आहे. त्यामुळे ओबीसी समाजातील विद्यार्थ्याचे खुप मोठ्या प्रमाणात हाल होत होते. स्वतंत्र कारभार नसल्यामुळे दोन दोन वर्ष शिष्यवृत्ती मिळत नसल्यामुळे मुले बहुतांशी ओबीसी समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले.स्वतंत्र मंत्रालयाच्या निर्णयामुळे ओबीसी समाजात आनंदाचे वातावरण झाले असून ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना खर्या अर्थाने न्याय मिळेल विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती शिक्षणात खुप फायदा होईल.
तेली समाजबांधवांतर्फे मुख्यमंत्र्यांचे आभार
स्व.गोपीनाथ मुंढे ,छगनराव भुजबळ, जयदत्त क्षिरसागर याच्यासह अनेक नेत्याचे प्रयत्न सुरू होते. ओबीसी सेल विजय चौधरी यांची प्रदेशाध्यक्ष निवड झाल्यापासून मुख्यमंत्र्याकडे सतत पाठपुरावा चालू ठेवला.मुख्यंमत्री देवेद्र फडवणीस याच्यासह विजय चौधरी याचे जाहिर आभार व्यक्त केले आहे. तेली समाज युवक आघाडी महेश चौधरी, जळगाव शहर तेली समाज युवक आघाडी देवेंद्र गागुंर्डे,सचिव मनोज चौधरी, उमेश चौधरी, दुर्गेश चौधरी, प्रसिध्द प्रमुख मधुकर चौधरी , उपाध्यक्ष दिलीप चौधरी, वासुदेव चौधरी ,पांडूरंग चौधरी, उदय चौधरी, सुनिल चौधरी, शेखर चौधणी, देवेद्र चौधरी, राजेद्र गागुंर्डे, नेताजी पाटील, रविद्र चौधरी, नितीन चौधरी, अशोक चौधरी, गिरिष चौधरी, अनिल पाटील, जगदिश चौधरी, कैलास चौधरी, विजय चौधरी, ललीत चौधरी, एकनाथ चौधरी, गणेश चौधरी यांनी आभार मानले.