जळगाव – बांधकाम काम करण्यासाठी दुचाकीवरुन जाणाऱ्या तिघांना भरधाव अोमनीने धडक दिल्याने अपघातात दुचाकीवरील दोन गंभीर तर एक जखमी झाल्याची घटना घडली. शनिवारी सकाळी ८.४५ वाजता हा अपघात जळगाव- शिरसोली रस्त्यावरील रायसोनी महाविद्यालयाजवळ झाला.
भुषण शाम मिस्त्री भोलेनाथ नगर, शिरसोली प्र.न. , सागर नाना पाटील , स्वामी समर्थ मंदिरा जवळ, शिरसोली प्र.न. हे दोघे गंभीर तर राहुल शांताराम पाटील,
अशोकनगर शिरसोली हा जखमी झाला आहे.
एमआयडीसी पोलिसांकडुन मदतकार्य
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश पवार, सचिन पाटील, निलेश भावसार, राजेंद्र ठाकरे या कर्मचार्यांनी धाव घेतली. व तत्काळ जखमींना उपचारार्थ डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले. यानंतर रस्त्यातील अपघातग्रस्त वाहने बाजुला करुन कर्मचार्यांनी वाहतूक सुरळीत केली.