जनशक्ती न्यूज । ओमायक्रॉन व्हेरिएंटवर अभ्यास सुरू असल्याने हा वेगाने पसरतो आणि घातक आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केलीये. तसेच लोकांनी करोना संदर्भातील खबरदारीचे उपाय घ्यावेत, असं म्हटलंय.
“२०२२ या वर्षात आपण करोना नावाच्या या साथीच्या रोगाचा अंत केला पाहिजे. येत्या वर्षात साथीच्या रोगाचा अंत करायचा असल्यास, वर्षाच्या मध्यापर्यंत प्रत्येक देशातील ७० टक्के लोकसंख्येचं लसीकरण केले जाईल, याची खात्री करून ही असमानता संपवायला हवी,” असंही ते म्हणाले.