पिंपळे सौदागरमधील शिवम सोसायटीचा उपक्रम
पिंपरी – पिंपळे सौदागर येथील शिवम सोसायटी अंतर्गत ओल्या कच-यापासुन कम्पोस्ट खतनिर्मिती प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे.साधारण सहाशे लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील प्रकल्पात मशीनद्वारे खत निर्मिती करण्यात येते. या उपक्रमाचे स्थानिक नगरसेवक विठ्ठल ( नाना) काटे व नगरसेविका .शितल नाना काटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
हे देखील वाचा
शिवम सोसायटीत एकूण १०४ सदनिका आहेत.या सोसायटीत दररोज एकुण १टन ओला कचरा संकलित केला जातो.ओला व सुका कच-याचे अलगीकरण करून तो सोसायटीतील प्लँट मधे संकलित करण्यात येतो.सध्या सोसायटीच्या एकाच विभागात हे काम सुरू करण्यात आले आहे एकुण एक टन ओल्या व सुक्या कच-यापासुन येथे खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प येथे सुरू करण्यात आला आहे.सोसायटीतील सर्व नागरीक या उपक्रमात योगदान देत आहेत. यात संकलित झालेला कचरा प्लँट पर्यंत पोचविण्यासाठी जागोजागी कचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे.जागेवरच ओला व सुका कच-याचे अलगीकरण होत असल्याने हे काम सोप्या पद्धतीने करण्याचा मानस सोसायटी सभासदांकडुन करण्यात आला आहे.यासाठी सोसायटीच्या प्रत्येक कोपरा,आणी आवारात ओला व सुका कचरा संकलनासाठी डस्टबिन ठेवण्यात आले आहेत.सोसायटी परिसर व उद्यानातील पडणारा पालापाचोळा,घरातील कचरा एका ठिकाणी संकलित केला जातो.. तीन महिन्यात संकलित कच-याची पहिली खेप (बँच) निघणार आहे.सुरूवातीला या खताचा सोसायटीतील घरातील फुलझाडे,उद्यानातील झाडांना या खताचा उपयोग करण्यात येणार आहे. तर गरजेपेक्षा आधिक संकलित झालेल्या खताची मागणीनुसार विक्री करणार असल्याचे सोसायटीच्या वतीने सांगण्यात आले.या खतनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन स्थानिक नगरसेवक विठ्ठल नाना काटे व नगरसेविका .शितल नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सोसायटीचे चेअरमन .विक्रम टिकेकर,.संदीप भोळे, .निलेश अटल, .संजय मुंदडा, .मनोज हरमाळकर ग्यान ठाकूर, .जितेंद्र हंडा व सोसायटीमधील सभासद आदी उपस्थित होते.