जळगाव : सकाळचे काम आटोपून पाळधीकडून शहराकडे दुचाकीने दोघेजण जात असतांना ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणार्या भरधाव अॅपे मालवाहू गाडीला जोरदार धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले असून नागरीकांच्या मदतीने दोघांना रिक्षात बसवून जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी 12 जून रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, हखला हाजी खाटीक (वय-50)रा.बागवान गल्ली, जोशी पेट व फिरोज मियालाल पटेल (वय-25) रा. मेहरूण जळगाव हे दोघे विना नंबर होन्डा शाईन गाडीने पाळधीला गेले होते. पाळधी येथून काम आटोपून शहराकडे परतत असतांना दादावाडी येथील जैन मंदीरासमोर राष्ट्रीय महामार्गावर ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणार्या मालवाहू अॅपेरिक्षा क्रमांक (एमएच 18 एस 8106) च्या उजव्यासाईडला जोरधार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, दुचाकीवरील दोघांचे उजवा पाय पुर्णपणे फ्रॅक्चर झाले आहे. हखलाख हाजी खाटीक यांच्या डोक्याला जबर मार बसला असून एक हात आणि पाय पुर्णपणे फ्रॅक्चर झाला आहे. तर दुचाकी चालक फिरोज मियालाल पटेल यांच्या पायदेखील फ्रॅक्चर झाला.
दोघांना खासगी रूग्णालयात रवाना
अपघात घडता रिक्षा चालकाने रिक्षा महामार्गाच्या बाजूला लावून फरार झाला होता. या मालवाहू गाडीत काही आसार्या तर पत्रे घेवून जात होता. हखला खाटीक हे बांधकाम व्यवसायीक असून बांधकाम करण्याचे ठेके घेण्याचे काम करत होते. अपघात झाल्यानंतर त्यांना दैनिक देशदुतचे उपसंपादक जरेश शिरसाट आणि दैनिक जनशक्तिचे उपसंपादक जितेंद्र कोतवाल रांनी तातडीने धाव घेवून खासगी रिक्षाने जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. तसेच त्यांच्या खिश्यातल्या मोबाईलद्वारे नातेवाईंकांना संपर्क करून कळविले. एक तासानंतर नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात धाव घेतली होती. यानंतर त्यांनी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.