गुजराल पेट्रोल पंपाजवळील घटना; ट्रकचालक पोलीसांच्या ताब्यात
जळगाव । चुकीच्या मार्गाने ट्रकला ओव्हर टेक करतांना तोल गेल्याने मोटारसायकल वरून जाणार्या दोघांपैकी मागे बसलेला व्यक्ती दुचाकीवरून पडल्याने ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला. मात्र ट्रक चालकाच्या प्रसंगावधाने दुचाकीवरील दोघे थोडक्यात बाचावले आहे. ही घटना दुपारी 3.45 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील गुजराल पेट्रोल पंपाजवळ झाली असून नागरीकांच्या मदतीन जखमीस जिल्हा रूग्णालयात दाखल केले. जखमी दारूच्या नशेत असल्याने जिल्हा रूग्णालयात उपचार घेण्यास नकार देत असल्याने जखमी अवस्थेत जिल्हा रूग्णालयाच्या बाहेर बसून होता. मात्र अपघात झाल्यानंतर ट्रकसह चालक आणि दुचाकी जिल्हा पेठ पोलीसात जप्त करण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती अशी की, दिपक गोकुळ कुंभार (वय-29) आणि सुपडू गोकुळ कुंभार (वय-31) रा. पुनगाव ता.यावल हे दोघी भाऊ त्याच्या मित्रांच्या मोटारसायकल (एमएच 19 एक्स 2922) ने एरंडोल येथे पैश्याच्या कामानिमित्त गेले होते. सुपडू कुंभार यांच्या मुलीचे लग्न असल्याने पैसे घेवून एरंडोलकडून घराकडे परतत असतांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील गुजराल पेट्रोल पंप जवळील आदर्श हॉटेल जवळ रोडच्या खाला डाव्याबाजूच्या रस्त्याने जात होते. महामार्गावर याचवेळी त्याच दिशेने धुळ्याकडून भुसावळकडे 12 चाकी ट्राला क्रमांक (एमए 18 एए 7324) जात होता. रोडाच्या खाली उतरलेल्या दुचाकीवर जाणारे चालक दिपक कुंभार आणि सुपडू कुंभार यांनी चुकीच्या मार्गाने ट्रकला ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात रोडवरून दुचाकी उदळल्याने मागे बसलेले सुपडू कुंभार हे रोडवर फेकले गेल्याने मागून येणार्या भरधाव वेगाने येणार्या ट्रकच्या मागच्या चाकात येवून उजव्या पायाची दोन बोटे तुटली तर डोक्याला गंभीर बसून दोन्ही कान तुटले केले.
उपचार घेण्यास जखमीची टाळाटाळ
यावेळी जिल्हा पोलीसात या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनस्थळी धाव घेतली. जखमी तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ रवाना केले मात्र टजखमी झालेले सुपडू कुंभार यांना त्याचा भाऊ दिपक कुंभार यांनी रिक्षातून जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांच्या जखमेवर चांगल्यापद्धतीने उपचार व्हावा यासाठी वैद्यकिय अधिकार्यांनी प्रयत्न केले. मात्र अधिक प्रमाणात दारू पिले असल्याने त्यांनी प्राथमोपचार घेवून बाहेर निघाले. त्यामुळे ट्रकजरी जिल्हा पेठ पोलीसात जमा करण्यात आले. अपघात झाल्यानंतर जखमीची माहिती घेण्यासाठी पोलीस कर्मचारी जिल्हा रूग्णालयात तपास केला. यावेळी कोणत्याही पद्धतीची नोंद नसल्याने त्यांनी देखील जखमीचे उपचारासाठी विनंती केली तरीही जखमी अवस्थेतही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.