ओव्हरटेक करणार्‍या बुलेटची रिक्षाला जोरदार धडक

0

जळगाव। शहरातील मुळजी महाविद्यालयाजवळ बुधवारी सायंकाळी 5.15 वाजेच्या सुमारास एका रिक्षाला मागून ओव्हरटेक करणार्‍या बेलेटस्वाराने समोरून येणार्‍या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा खांब्यावर आदळली जावून पलटी झाली. यात रिक्षाचालकास तीन प्रवासी महिलांना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, एका वृध्द प्रवासी महिलेच्या डाव्या पायाला जबर दुखापत झाली. तर बुलेटस्वारासही किरकोळ जखमी झाला आहे.

अन् रिक्षा धडकली विद्युत खांबावर
बुधवारी सायंकाळी रिक्षा क्रं. एमएच.19.जे.8158 वरील चालकाने नवीन बसस्थानक परिसरातून तीन प्रवासी महिला रिक्षात बसविल्या. त्यानंतर चालक प्रवासी घेवून हरिविठ्ठलसाठी तेथून रवाना झाला. मात्र, मुळजी जेठा महाविद्यालयाजवळील अ‍ॅक्सीस बँकेसमोरून जात असतांना समोरून येणार्‍या एका रिक्षाला मागून ओव्हरटेक करणार्‍या बुलेटस्वाराने या रिक्षाला समोरून जोरदार धडक दिली. धडक ऐवढी जोरदार होती की रिक्षा ही बाजुलाच असलेल्या एका खांब्यावर जावून आदळली आणि पलटी झाली. यात रिक्षाचालकासह तिनही महिला जखमी झाल्या. परंतू त्यातील वृध्द प्रवासी महिलेच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत होवून पायातून रक्तस्त्राव होत होता. तर बुलेटस्वाराही फेकल्या गेल्याने त्याच्या हातालाही दुखापत झाली. या अपघातात रिक्षासह बुलेटचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर परिसरातील विद्यार्थ्यांसह नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत रिक्षा उभी केली. त्यातुन जखमींना बाहेर काढून लागलीच दुसर्‍या रिक्षातून खाजगी रूग्णालयात उपचारार्थ पाठविले. दरम्यान, बुलेटने धडक दिल्यानंतर रिक्षाही खांब्यावर आदळली गेली. खांबा जर नसता तर रिक्षा ही चक्क नाल्यातच पडली असती. सुर्देवाने खांबा आडवा आल्याने अनर्थ टळला.