‘ओ माय गॉड’ ‘ते ’ मंदिर कुणाचे? महापालिका तपासणार मालकीहक्क

0

महाबळमधील मंदिराबाबत चौकशी होणार : जिल्हाधिकार्‍यांची दोन्ही गटाशी चर्चा

जळगाव– महाबळ परिसरात खुल्या भुखंडावर गेल्या 37 वर्षांपासून असलेल्या श्री समर्थ रामदास स्वामींचे मंदिराच्या ताब्यावरुन दोन गटात वाद सुरु आहे. या वादातून मंदिराला कुलूप लावण्यात येवून ते बंद करण्यात आले. याप्रकरणाची दखल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास बजरंग दल व विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मंदिराचे कुलूप तोडून मंदिर सर्व नागरिकांसाठी खुले करुन दिले होते. मंदिर हक्काबाबतचा या वाद शनिवारी महापालिकेच्या दालनापर्यंत पोहचला. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दोन्ही गटांशी चर्चा केली. मंदिराच्या जागेच्या मालकीहक्काबाबत चौकशी केल्यानंतर पुढील कार्यवाही करणार असल्याचे आदेश त्यांनी दोन्ही गटांना दिले आहेत.

शहरातील महाबळ परिसरातील महाराष्ट्र बँक कॉलनी परिसरात खुल्या भुखंडावर गेल्या अनक वर्षांपासून श्री रामदास स्वामींचे मंदिर आहे. या मंदिरावर अरुण प्रल्हाद दिक्षीत हे या मंदिराचे ट्रस्टी असल्याचे सांगून मंदिराचा सांभाळ करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून मंदिराच्या ट्रस्टच्या मालकीवरुन दिक्षीत व विनोद देशमुख यांच्यामध्ये वाद सुरु होते. दरम्यान दोन्हींकडून मंदिराला कुलूप लावून देवांना बंदिस्त देखील करण्यात आले होते. मनपा प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी यांनी दोन्ही गटातील सदस्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी बोलविले होते. दरम्यान शनिवारी दुपारी आयुक्तांच्या कार्यालयात विनोद देशमुख, माजी नगरसेविका अश्‍विनी देशमुख हे परिसरातील नागरिकांसह तर दुसर्‍या गटातील अरुण दिक्षीत हे काही नागरिकांना घेवून मनपात आले होते.

आयुक्तांनी जाणून घेतली दोन्ही गटाची भूमिका

मंदिराच्या वादावरुन दिक्षीत व देशमुख हे दोन्ही गट महापालिकेत दाखल झाले. यावेळी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दोन्ही गटातील सदस्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांची भुमिका जाणून घेतली. खुल्या भूखंडावर बांधलेल्या मंदिरात सर्वांना जाण्याचा अधिकार असून ते मंदिर सार्वजनिक आहे. कोणीही त्याठिकाणी कुलूप लावून मालकी हक्क दाखवू नये. तसेच खुल्या भुखंडावर बांधण्यात आलेल्या मंदिराच्या जागेबाबत चौकशी करुन त्यठिकाणी बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकाम तोडण्याचा इशारा देखील जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. ढाकणे यांनी दोन्ही गटांना दिला.

मंदिराच्या मालकी हक्कावरुन दोन गटात वाद सुरु आहे. शुक्रवारी दोन्ही गट समोरासमोर आल्याने त्याठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटाची समजूत काढली. दरम्यान, मंदिराच्या वादावर दोन्ही गटामध्ये वाद धार्मिकतेच्या नावाखाली समाजातील वातावरुन दुषीत करुन शांतता भंग केल्यास दोन्ही गटांमधील नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देखील जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. ढाकणे यांनी दिला. खुल्या भुखंडावर धार्मीक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास बंदी आणू नये, भूखंडाची मोजणी करुन त्याठिकाणी करण्यात आलेले अतिक्रमण काढण्यात यावे, बाहेरीत व्यक्तीने त्याठिकाणी येवून कार्यक्रम घेवू नये या मागण्यांचे निवेदन विनोद देशमुख यांच्यावतीने जिल्हाधिकारी तथा आयुक्तांना देण्यात आले. यावर परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षर्‍या आहे