अंबरनाथ । अंबरनाथ नगरपरिषदेतर्फे स्वछता सर्वेक्षणातर्गत शहरातील शाळा, गृहनिर्माण सोसायट्या, रुग्णालय आणि हॉटेल्स यांची तपासणी करण्यात येऊन अलीकडेच गुणानुक्रम जाहीर करण्यात आले. यातील गृहनिर्माण सोसायटी गटा मध्ये पूर्वेकडील औदुंबरछाया गृहनिर्माण सोसायटीच्या गटांमध्ये प्रथम क्रमांक आला असून शाळांच्या गटामध्ये पश्चिमेकडील सुहासिनी अधिकारी भगिनी मंडळ शाळा क्रमांक 2 या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला असल्याची माहिती मुख्याधिकारी देविदास पवार यांनी दिली.अंबरनाथ शहरात स्वछता सर्वेक्षण 2018 हि मोहीम यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, उपनगराध्यक्ष अब्दुल शेख आणि सर्व नगरसेवक तसेच पालिकेचे अधिकारी व कर्मचारी सक्रिय सहभागी झालेले असून नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी होऊन आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी देविदास पवार यांनी केले आहे.
दोन समितींनी केली तपासणी
स्वछता सर्वेक्षणासाठी नगरपरिषदेने शहरातील शाळा, गृहनिर्माण सोसायट्या, रुग्णालय आणि हॉटेल्स यांची तपासणी करण्यासाठी दोन समित्या स्थापन केल्या होत्या. स्वछता व आरोग्य समितीचे सभापती रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती स्थापन कऱण्यात अली होती, या समितीने आपापल्या क्षेत्रातील अस्थापनाची शासनाच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे तपासणी केली. डिसेंम्बर 2017 मध्ये सदरची तपासणी करण्यांत आली आणि डिसेंबर अखेर त्याचा निकाल सादर करण्यात आल्याचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी सांगितले.
शाळांच्या गटात सुहासिनी अधिकारी भगिनी मंडळ शाळा क्रमांक 2। ने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या गटात एकूण 8 क्रमांक काढण्यात आले आहेत. रुग्णालय गटात पूर्वेकडील आदित्य नर्सिंग हॉस्पिटल ने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. या गटात सात क्रमांक काढण्यात आले असल्याचे पवार यांनी सांगितले. हॉटेल च्या गटात आनंद नगर औद्योगिक वसाहतीत असलेल्या नक्षत्र हॉटेल ने प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. या गटात 8 क्रमांक काढण्यात आले आहेत. व्यापारी संघातील गटात छत्रपती शिवाजी मार्केट संघटनेने प्रथम क्रमांक पटकावला असुन या गटात तीन क्रमांक काढण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी देविदास पवार यांनी दिली. लवकरच एका कार्यक्रमात त्यांना पारितोषिके व प्रशस्तीपत्र देण्यात येणार असल्याचेही पवार म्हणाले.