औंधमधील महादजी शिंदे पूल रूंद करावा करण्याची मागणी

0

 पुणे:औंध येथील महादजी शिंदे रस्ता तीस मीटर रूंद करावा, या मागणीसाठी परिसरातील सोसायट्यांमधील नागरिकांनी शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले. या रस्त्यावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे हा रस्ता तीस मीटरचा करण्याच्या अनेक हरकती स्थानिक नागरिकांनी नोंदविल्याने विकास आराखड्यात (डीपी) हा रस्ता ३० मीटर दाखविण्यात आला होता. मात्र, या भागात असलेल्या काही व्यावसायिकांच्या दबावामुळे या रस्त्याची रूंदी ३० मीटरवरून २४ मीटर करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे .

औंध भागातील महादजी शिंदे रस्त्यावर दररोज वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे नागरिकांना तसेच वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या भागात असलेल्या व्यापारी संकुलामुळेही वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. त्यामुळे हा रस्ता ३० मीटर रूंद करावा, अशी मागणी महादजी शिंदे रोड कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

समितीचे अशोक पाठक,विकास नाडकर्णी, यांच्यासह मंगेश घुगे, विनय श्यामराज, हिरामण ठोंबरे, मिलिंद कदम नितीन राणे, विद्यासागर भापकर, प्रशांत थोरात, अरुण भापकर, विनय शमराज आदी या वेळी उपस्थित होते. तसेच शेकडो नागरिक हजर होते .स्थानिक नगरसेविका अर्चना मुसळे, भारतीय जनता पक्षाच्या विधी सेलचे देश उपाध्यक्ष मधुकर मुसळे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.