औंध : औंध नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये औंध जनसेवा सहकारी पॅनेल विजयी झाले आहे. ही कार्यकारिणी पाच वर्षांसाठी (2017-22) असणार आहे.
विजयी उमेदवारांमध्ये राहुल गायकवाड, सचिन रानवडे, सचिन कलापुरे, मंगेश चोंधे, सुरेश चोंधे, विजय गायकवाड, सुरेख गायकवाड, ज्योती पवार, दत्तात्रय होळकर, बबन मदने यांचा समावेश असून औंध जनसेवा सहकारी पॅनेल विजयी उमेदवारांचे दत्तात्रय गायकवाड व नगरसेविका संगिता गायकवाड, सागर गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.