बारामती । बारामती येथील औद्यागिक वसाहतीतील गोदरेज अॅग्रोवेट न्यू बारामती प्रा. लि. या पशुखाद्य बनविणार्या कंपनीत बालकामगार काम करीत असत असल्याचे आढळून आले आहे.
याबाबतची तक्रार अमर अवघडे या तरूणाने बारामती तालुका ग्रामीण पोलिस स्टेशनला केली आहे. बारामती औद्यागिक वसाहतीतील (पेन्सील चौकनजीक) गोदरेज अॅग्रोवेट न्यू बारामती ही पशुखाद्य कंपनी आहे. या कंपनीत बालकामगार असल्याची माहिती अवघडे यांना मिळाली. बालकामगार काम करीत असतानाचे फोटो, एका बालकामगाराने स्वत: पोलिस ठाण्यात दिलेला जबाब, व्हिडिओ चित्रीकरण याच्या आधारे कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.