नऊ महिन्यात ‘स्वाईन फ्लू’ने घेतला 28 जणांचा बळी
डेंगीचे 103 रुग्ण आढळले पॉझिटिव्ह
पिंपरी-चिंचवड : शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. जानेवारीपासून स्वाईन फ्ल्यूने 28 जणांचा बळी घेतला आहे. तर, वर्षभरात 103 रुग्ण डेंगीचे पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, बुधवारी डेंग्यूने महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. हवेतील गारवा आणि बदलत्या वातावरणाने ‘स्वाईन फ्लू’ने पिंपरी-चिंचवडमध्ये कहर माजविला आहे. मरण पावलेल्या 28 पैकी 9 रुग्ण शहराबाहेरचे होते. आजमितीला 23 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून त्यापैकी सात रुग्ण व्हेटिंलेटरवर आहेत. त्यातील एकाची प्रकृती नाजूक आहे. तर, स्वाईन फ्ल्यूच्या संशयाने 592 जण दवाखान्यात दाखल झाले होते. त्यापैकी 162 रुग्णांवर उपचार झाले असून ते बरे झाले आहेत.
हे देखील वाचा
या परिसरात डेंगी
शहरात स्वाईन फ्ल्यूने कहर माजविला असतानाच डेंगीने पुन्हा डोके वर काढले आहे. जानेवारी महिन्यात तीन, ऑगस्टमध्ये 53 आणि ऑक्टोबर महिन्यात 26 यासह एकूण डेंगीचे 100 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. वाकड, वाल्हेकरवाडी, रावेत या परिसरात डेंगीचे रुग्ण जास्त आढळल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे.
स्वाईन फ्ल्यू, डेंगीची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावे. खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या डेंग्यूच्या रुग्णाची संपूर्ण माहिती महापालिकेला कळविण्याचे आदेश सर्व रुग्णालयांना दिले आहेत. वातावरणात सारखाच बदल होत आहे. त्यामुळे ‘व्हायरल’ कधी कमी होईल हे सांगता येत नाही.
डॉ. के. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी