औरंगाबाद : औरंगाबादच्या चितेगाव येथील व्हिडीओकॉन कंपनीत भीषण आग लागली आहे. कंपनीच्या बाहेर भंगार सामान ठेवले होते. त्या भंगाराला ही आग लागली आहे. भंगारात थर्माकोल, कागदाचे पुठ्ठे याचं प्रमाण जास्त असल्यानं आग चांगलीच भडकली आहे. दुरूनही धुराचे लोळ आकाशात दिसत आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.