औरंगाबादजवळ अपघातात काँग्रेसचे राज्य सचिव संजय चौपाने ठार

0

औरंगाबाद | औरंगाबाद-गंगापूर रोडवरील भेंडाला फाटा येथे बस-फॉर्च्यूनर कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात काँग्रेसचे राज्य सचिव संजय चौपाने जागीच ठार झाले. ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर गंभीर जखमी झाले. मुबंईचे काँग्रेस नेते रमाकांत म्हात्रे किरकोळ जखमी झाले.