औरंगाबादमध्ये चोरी झालेला ट्रक धुळे पोलिसांनी पकडला

0

धुळे। औरंगाबाद औद्योगिक वसाहतीमधील वाळुंज मधुन चोरीस गेलेला मालट्रक धुळे शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने सापळा लावून हिरे वैद्यकीय महाविद्यालयजवळील हॉटेल भंडारा जवळ ट्रक चोरीची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलीसांनी ताब्यात घेतली.

चोरटयांनी नाकाबंदी पाहून ट्रक उभा करून अंधारात पळ काढला. सदर ट्रक हस्तगत करून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वाळुंज पोलिसांना माहिती दिली. दिनांक 11 एप्रिल रोजी चक 04/लि-2691 हा ट्रक चोरीस गेला होता. 4 रोजी औरंगाबाद पोलिसांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात फोनद्वारे कारवाई करण्यास सांगितले होते. पोलीस निरीक्षक दिवानसिंग वसावे, नाना आखाडे, असई हिरालाल बैरागी, मिलिंद सोनावणे, जगदीश खैरनार, किरण जगताप, दिनेश काळे, मच्छिंद्र पाटील, मुख्तार मन्सूरी, योगेश चव्हाण, चेतन सोनवणे, दिनेश शिंदे यांनी कारवाई केली.