औरंगाबाद । येथील जिन्सी भागात रस्त्याच्या कडेला उभा असलेली 5 माल वाहतूक वाहने जळून खाक झाल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. काही अंतरावर पोलिस ठाणे देखील आहे. त्या ठिकाणी ही घटना घडली.
शहरातील या अगोदरच्या घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेता आग लावल्याची शक्यता नाकारता येत नाही. पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत मालवाहतूक वाहने पेटल्याने मोठा भडका उडाला. त्यानंतर अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली. जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नसून घटनेची नोंद जिन्सी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.