औरंगाबादेत कचर्‍यावरून हिंसक आंदोलन

0

औरंगाबाद : औरंगबादमध्ये कचरा प्रश्‍न पेटला असून मिटमिटा, पडेगाव येथे कचरा टाकायला आलेल्या गाड्यांवर स्थानिक ग्रामस्थांनी जोरदार दगडफेक केली. दोन गाड्यांची तोडफोड झाली असून, नऊ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. संतप्त ग्रामस्थांना पांगविण्यासाठी पोलिसांनी जोरदार लाठीहल्लाही केला.

त्यात अनेक ग्रामस्थ जखमी झालेत. गेल्या काही दिवसांपासून औरंगबादेत कचरा प्रश्‍न चिघळलेला होता. त्याला बुधवारी हिंसक वळण मिळाले. मुंबई माहामार्गावरील मिटमिटा या ठिकाणी ग्रामस्थांनी आंदोलन केले. आंदोलकांचा उद्रेक पाहून त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच संतप्त जमावाला रोखण्यासाठी गोळीबारदेखील करण्यात आला.