औरंगाबाद घाटीतील अपंगावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

0

सोयगाव । प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे जिल्हाध्यक्ष यांच्यावर भ्याड हल्याच्या निषेधार्थ सोयगाव प्रहार अंपग क्रांती आदोलनच्या वतीने आदोलानाचा इशारा देण्यात आला आहे. औरंगाबाद घाटीतील अपंगावरील भ्याड हल्यातील सुरक्षा रक्षक संजय सताव व विकास काळदाते यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी सोयगाव तालुका कार्याध्यक्ष संदीप इंगळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. प्रहार अंपग क्रांती आंदोलनचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांना सुरक्षा रक्षकांनी वाद घालत एका सुरक्षा रक्षकांनी काठी मारल्याने डोक्यातून रक्त स्राव झाला होता.

आंदोलनाचा दिला इशारा: शिवाजी गाडे हे असे व्यक्ती आहेत कि त्यांना कोणत्याही अंपग व्यक्तीने फोन करून अडचण सांगितली कि, हातातील कामे टाकत अंपगासाठी धावून येतात. कारण सोयगाव तालुका औरंगाबादहून 120 कि.मी. असल्यावर घाटीत अंपग प्रमाणपत्र घेण्यासाठी सोयगावहून गेल्यानंतर 11 ते 12 वाजतात अशा परस्थित ते आमच्या साठी पैठण येथून येवून मदत करतात. या भ्याड हल्यामुळे घाटी प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. जर भ्याड हल्यातील सुरक्षारक्षक संजय सताव व विकास काळदाते यांच्यावर कडक कार्यवाई झाली नाही तर तीव्र आदोलन छेडण्यात येईल. यावेळी नायब तहसीलदार गवळी यांनी निवेदन स्विकारले. या निवेदनावर सोयगाव संदीप इंगळे, सोयगाव येथील रतन साखळे, गजानन चव्हाण, किशोर मोरे व ईश्वर इंगळे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.