औरंगाबाद: आज औरंगाबाद मनपाची बैठक होती, यात लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सेनेच्या खासदारांचे अभिनंदन करण्यात आले. यावर एमआयएमच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतल्याने गोंधळ झाला. यात एमआयएमच्या ६ नगरसेवकांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे. एमआयएमने खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला होता. याला शिवसेनेने विरोध केल्याचे आरोप एमआयएमने केले आहे.