औरंगाबाद येथे सुरु झाला पत्नी पीडितांसाठी आश्रम

0

औरंगाबाद । औरंगाबाद-शिर्डी रस्त्यावर पत्नी पीडित पुरुष आश्रम, हा बोर्ड आणि इमारत सध्या चर्चेचा विषय बनला असून येथे पत्नी पीडितांनी एकत्र येऊन आश्रम सुरु केला आहे. महिलांच्या बाजूने कायदे आहेत, महिलांना समाजाची सहानुभूती मिळते. त्यामुळे काहीवेळा पुरुषाची चूक नसतानाही नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हा आश्रम भरत फुलारेंनी स्थापन केला आहे. या आश्रमाचे उद्घाटन जागतिक पुरुष हक्क दिनचे औचित्य साधून करण्यात आले. या आश्रमात सध्या सहा जण राहतात. स्वत:ची कामे स्वत: करतात.

वर्कशॉपच्या माध्यमातून आश्रमाचा कारभार
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप काही जणांवर आहे. काही जणांविरोधात शारीरिक आणि मानसिक छळाची तक्रार आहे. त्यांना कायदेशीर मदत करणे, मानसिक आधार देणे, त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी पत्नी पीडित संघटना झटत आहे. खोट्या केसेसमुळे पत्नी पीडितांच्या या आश्रमाला अडचणीत आलेल्यांनी फंडिंग केले असून वर्कशॉपच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न यावर आश्रमाचा कारभार चालतो. गेल्या काही वर्षात घटस्फोटांच्या केसेसमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत, पण विभक्त होतानाही काही वेळा मानसिक छळाचे प्रकार घडतात. काही वेळा न्यायालयीन लढाईत पुरुष आणि स्त्री दोघांचंही मानसिक आणि आर्थिक खच्चीकरणही होते. जे भरुन निघणं अवघड आहे.