औषधांच्या किंमती कमी करण्यासाठी जीएसटी कौन्स‍िलकडे पाठपुरावा

0
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती 
नागपूर  : मधुमेह, कर्करोग या आजारावरील औषधांच्या किंमती कमी करण्याच्या दृष्टीने जीएसटी कौन्स‍िलकडे पाठपुरावा सुरु असल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत सांगितले. जनार्दन चांदुरकर यांनी मधुमेह, कर्करोग या आजारावरील औषधांच्या किंमती कमी करण्याबाबत केलेल्या कार्यवाहीबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
त्यावर उत्तर देताना  मुनगंटीवार म्हणाले, दुर्धर आजारावरील औषधांच्या किंमती कमी करण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी जीएसटी कौन्स‍िलकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. सध्या अशा औषधांवर 12 टक्के जीएसटी आहे. राज्य शासनाने अशा औषधांवर 5 टक्के जीएसटी लावावा अशी मागणी केली आहे. गोर गरीबांना अशा आजारासाठी मोफत औषधे देण्याचा शासन विचार करीत असल्याचेही शेवटी त्यांनी सांगितले.