औषधी घरपोच करून खाकीने घडविले माणुसकीचे दर्शन

0

अमळनेर-: सर्वत्र कोरोनाच्या आजाराने थैमान घातलेले असल्याने लॉकडाउन असल्यामुळे कुणालाही घराबाहेर पड़ता येत नाही यातच आईचे डायलिसिसचे औषधी संपल्याने ते पुणे किंवा औरंगाबाद येथेच मिळते यात सर्वत्र बंद असल्यामुळे मुलाची काळजी वाढल्याने मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांनी पाडळसे येथील सचिन योगराज पाटील यांच्या आईचे डायलीसीसचे औषध उपलब्ध करुन खाकीतील माणुसकीचे दर्शन घडविले.
पाडळसरे येथील माजी सरपंच बेबाबाई पाटील यांच्या दोन्ही किडन्या निकामी असल्यामुळे गेल्या सहा वर्षापासून डायलिसिस सुरु आहे. यात महिन्याला जवळपास ८० हजाराच्या औषधी त्यांना लागतात. आतापर्यंत लाखों रूपयाचा खर्च त्यांनी केला आहे. त्यात औषधी संपल्याने सचिन पाटील औषधी घेण्यासाठी जाण्याच्या विचारात असतानाच मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरक्षक राहुल फुला यांचेकडे तपास केला असता मेडीसीन ही अत्यावश्यक सेवा असल्याने त्यांनी औरंगाबाद येथील एजन्सी चालकास स्वत:च्या मोबाईलवरुन संपर्क घरपोच औषधं पाठविण्यासाठी पाठपुरावा केला. ती औषध रविवारी खाजगी वाहनाने प्राप्त झाल्यानंतर औषधी त्यांचे घरी जावुन दिली. औषधी घरपोच करीत खाकीतील राहुल फुला यांनी जणू माणुसकीचेच दर्शन घडविले.