जळगाव। 30 मे रोजी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेतर्फे देशात व राज्यात बेकायदेशीर पद्धतीने केमिस्ट विके्रत्यांना फार्मसीच्या माध्यमातून ऑनलाईन औषधी विक्री व ई पोर्टलच्या बाबत शासन व प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात मंगळवार 30 मे रोजी अखिल भारतीय औषधी विके्रता संघातर्फे देशासह राज्यात बंद पुकारण्यात आला. या पुकाराला जिल्ह्यातील मेडीकल डिस्ट्रीब्यूटर, मेडिकल, रिटेलर यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला होता. औषधी विके्रता संघाने पुकारलेल्या बंद मध्ये जिल्ह्यातील सर्वच मेडीकल विके्रत्यांनी बंद पाळला होता.
तक्रारी घेऊन शासन दरबारी जाऊनही उपयोग नाही
औषधांच्या विक्रिवर सरकारकरून लावण्यात आलेले कडक नियम शिथिल करावे, या मागणीसाठी एक दिवसाचा राष्ट्रव्यापी संप पुकारण्यात आला आहे. ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टकडून एक दिवसाचा संप पुकारण्यात आला आहे. पण असोसिएशनच्या या संपाचा फटका मात्र सर्वसामान्य लोकांना जास्त बसणार आहे. अखिल भारतीय औषधी विके्रता संघटनाच्या अंतर्गत देशभरात जवळपास 9 लाख मेडीकल सुरू आहेत. अनेक वेळा औषधी विके्रत्यांनी त्यांच्या तक्रारी व गर्हाणी सरकारकडे मांडण्याचा प्रयत्न केला तरीही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे संघटनेने 30 मे रोजी संपावर जाणार असल्याचे जाहिर केले होतो. देशांतर्गत राज्यव्यापी संपाची पुर्वसुचना राज्यपाल, पंतप्रधान कार्यालय, आरोग्य मंत्रालय, गृह मंत्रालय यासह संबंधीत नियंत्रक कक्षात देण्यात आली आहे. शासनाने जे निबर्र्ंध लावले आहे ते हटविण्याची मागणी औषधी विके्रत्यांनी केली आहे. औषधांच्या होणार्या ऑनलाईन विक्रीवरसुद्धा मेडीकल असोसिएशने आक्षेप घेतला असून ऑनलाईन औषधी विकल्यामुळे उत्पन्न कमी प्रमाणावर होत असल्याची माहिती यावेळी असोसिएशनने दिले आहे.