औषधी विक्रेत्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0

शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन

जळगाव – महाराष्ट्र सेल ॲण्ड मेडिकल रिप्रेझेटेटिव्ह असोशिएशनच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सर्व केमीस्ट आणि औषधी विक्रेत्यांना मोठ्या संख्येने सहभागी होते. खान्देश मॉलपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. तर केमस्ट संघांच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाची भेट घेवून विविध मागण्यांचे निवेदन दिले. जळगाव जिल्हा केमिस्ट असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील हा मोर्चा काढण्यात आला.

या आहेत मागण्या
वैद्यकिय प्रतिनिधींचे किमान वेतन २० हजार रूपये करा. सर्वांना ६ हजार रूपये मासिक पेन्शन करा, कामगार कायद्यातील कामगारविरोधी प्रस्तावित बदल रद्द करा, fix term employment रद्द करा, कामगार संघटनांना विश्वासात घेऊन कामगार कायद्यात बदल करा, बोनस ईएसआयसी आणि पीएफ वरचे सिलींग रद्द करा, ग्रॅज्यूईटीची रक्कम वाढवा. संरक्षण, रेल्वे, किरकोळ व्यापारातील थेट परदेशी गुंतवणुक रद्द करा. कंत्राटीकरण व आऊटसोर्सिंग रद्द करा. सरकारी नोकरीतील रिक्त पदे भरा व नविन रोजगार निर्मितीचे धोरण राबवा. महागाईला आळा घाला. जिवनावश्‍यक वस्तू वायदे बाजारातून वगळा. कामगार संघटनांचे रजिस्ट्रेशन ४५ दिवसात करा व आयएलओच्या शिफारशीची अंमलबजावणी करा. आणि सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यात यावी.

दोन तास वाहतूकीची कोंडी
खान्देश मिल कॉम्लेक्स ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेला मोर्चा अतिशय नियोजनबद्ध आणि शिस्तीत केमिस्ट संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी रस्त्यांच्या दोन्ही बाजून वाहतूकीची मोठी कोंडी झाली होती. मोर्चामुळे सुमारे दीड ते दोन तास वाहतूकीची कोंडी झाली होती. यावेळी शहर वाहतूक पोलीसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आले.