यावल : विविध औषधी पाठविण्याच्या नावाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जे.टी. महाजन व्यापारी संकुलातील मेडीकल स्टोअर्स चालकाची 48 हजारात फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील मोतीराम भांरबे यांनी ऑक्सीमीटर व मास्क मागवणण्यासाठी मानसा एन्टरप्रायजेस, बंग्लोर कंपनीकडे ऑनलाईन 48 हजार सातशे सोळा रुपयांचा भरणा केला मात्र कंपनीने कोणतेही साहित्य न पाठविता मेडीकल व्यवसायीक सुनील भारंबे यांची आर्थिक फसवणूक केली. भारंबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.