चिबंळी । गेल्या पधंरा ते वीस दिवसांपासून सतंतधार पाऊस सुरू असल्यामुळे चिंबळी येथे मोकळ्या पडीक जागेमध्ये मोठ्या प्रमाणात हिरवेगार गवत उगवले आहे तर इतर जागेत साचलेल्या कचर्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. अशातच डासांचा प्रार्दुभाव वाढल्यामुळे रोगराई वाढत आहे.
या परिस्थितीवर निंयत्रण मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे. चिंबळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाठाण हदीतील मोकळ्या जागेत उगवेलेल्या हिरव्या गवतावर तसेच ठिक-ठिकाणी साचलेल्या कचर्यावर औषध फवारणी सुरू करण्यात आली असल्याचे ग्रामसेवक दिनेश यांनी सागिंतले. येत्या आठ ते दहा दिवसांत गावातील सर्व ठिकाणी संपूर्ण परिसरात औषध फवारणी करून पावसामुळे उगवलेले हिरवेगार गवत काढण्यात येईल व कचरा हटविण्यात येणार असल्याचे ही सांगितले.