जामनेर। कंगणा राणावत हिला पद्मश्री किताब मिळाल्यानंतर जे बेताल विधान केले की, 1947 रोजी मिळालेले स्वातंत्र्य हे भिकेच्या कटोर्यात मिळालेले स्वातंत्र्य होते. भारत हा 2014 ला स्वतंत्र झाला. या बेताल व अपरिपक्व विकसित मेंदुच्या स्त्रीने असंख्य जवान स्वातंत्र्य सैनिक व स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले बलिदान दिले. त्या सर्वांचा तिने घोर अपमान केलेला आहे. तिला कोणत्या कारणासाठी किताब देण्यात आला आहे, तेही अजुन जनतेला कळालेले नाही. अशा या बेतालपणामुळे तिने देशाची प्रतिमा मलीन केली आहे. तिला मिळालेला किताब शासनाने विनाविलंब परत घ्यावा व तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा तात्काळ दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासंदर्भात देण्यात आले.
यावेळी कळमसराचे सरपंच अशोक चौधरी, पं.स.सदस्य छाया पाटील, महिला तालुकाध्यक्ष कविता बोरसे, युवक तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, जामनेर शहराध्यक्ष पप्पु पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, कार्याध्यक्ष डॉ. बाजीराव पाटील, शहर उपाध्यक्ष उत्तमराव पाटील, उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे, शहर सचिव अहेकाज अहमद मुल्लाजी, शहर उपाध्यक्ष शाहीद इकबाल, युवराज पाटील, अजहर शेख, राजु शेख, निखिल निकम, कैफ शेख, अजहर सैय्यद, अहमद खान, मोहन चौधरी, दत्तात्रय नेरकर, प्रभु झाल्टे, विनोद माळी यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.