कंगनाच्या कार्यालयावर हतोडा; महाराष्ट्रात ‘बाबर’ आला

0

मुंबई: अभिनेत्री कंगना रानौतच्या मुंबईतील ‘मणीकर्णिका’ या चित्रपटासाठी तयार करण्यात आलेले कार्यालयाचे बांधकाम अनधिकृत असल्याने बीएमसीने त्याच्यावर कारवाईची सुरुवात केली आहे. कंगनाच्या कार्यालयावर हातोडा चालविण्यात येणार आहे. बीएमसीचे अधिकारी आणि कामगार कार्यलयात दाखल झाले असून थोड्याच वेळात कार्यलयाच्या तोडक कारवाईला सुरुवात होणार आहे.

दरम्यान कंगना रानौत आज बुधवारी मुंबईत येणार आहे. मुंबईला येण्यासाठी ती हरियाणाहून निघाली आहे. थोड्याच वेळात ती मुंबईला पोहोचेल. तत्पूर्वी कंगना रानौतने ट्वीट केले आहे. ‘माझे कार्यालय अयोध्या या चित्रपटासाठी तयार करण्यात आले होते. परंतु त्यावर मुंबई महानगर पालिकेने हातोडा चालविला आहे. हा हातोडा माझ्या कार्यालयावर नाही तर राम मंदिरावर आहे. इतिहासाची पुनरावृत्ती झाली असून बाबर आला आहे. बाबरकडून राम मंदिर पाडले जात आहे. मात्र आम्ही पुन्हा राम मंदिर बांधू जय श्रीराम, जय श्रीराम’ असे ट्वीट कंगना रानौतने केले आहे.