कंगना रानौत अडचणीत; विधान परिषदेत हक्कभंगचा प्रस्ताव

0

मुंबई : मुख्यमंत्र्यासह राज्यातील काही नेत्यांचा एकेरी उल्लेख करत अवमान केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचा संपादक अर्णब गोस्वामीविरोधात शिवसेनेने आज मंगळवारी ८ रोजी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. यावरून भाजप विरुद्ध सत्ताधारी आमने-सामने आले. त्यानंतर आता अभिनेत्री कंगना रानौतच्या अध्च्नीत वाढ होण्याची चिन्हे आहे. विधान परिषदेत अभिनेत्री कंगना राणौतवरही हक्कभंग प्रस्ताव दाखल झाला आहे. काँग्रेसने हा प्रस्ताव दाखल केला आहे. कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी हा प्रस्ताव मांडला.

कंगनाने ‘मुंबई ही पीओकेसारखी वाटते, मुंबई कोणाच्या बापाची नाही, मुंबई पोलिसांपेक्षा माफिया बरे’ अशी वक्तव्ये केली होती. यावरून महाराष्ट्रासह अभिनेते, नेत्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठविली होती. त्यानंतर आता काँग्रेसने कंगनाविरोधात हक्कभंग सादर केला आहे. आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगना रानौतविरोधात निषेध करणारा ठराव मांडला आहे.

‘मुंबईत परप्रांतीय मुलगी येते नाव कमावते आणि महाराष्ट्र मुंबईचा अपमान करत असे बेताल आणि खेद जनक वक्तव्य करते. महाराष्ट्राची बदनामी सहन करणार नाही, मुंबई पोलिसांची बदनामी सहन करणार नाही, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. यावर कंगना राणावतने बेताल वक्तव्य केले आहे, तिच्यावर कारवाई करा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केली आहे.