जळगाव । येथील रहिवासी असलेल्या बबलू सुभाष नवले या तरुणाची इचलकरंजी येथे निर्घुण हत्या करण्यात आली. या घटनेचे महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटत असल्याने कंजरभाट समाजातर्फे या घटनेचा निषेध म्हणून मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मूक मोर्चा अंधशाळेपासून दुपारी 11 वाजेला सुरुवात झाली. यामध्ये समाजातील महिला, समाजबांधव ज्येष्ठ पंचासह युवकांनी सहभाग नोद्विला होता. शांततेच्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालया पर्यत मोर्चा काढण्यात आला होता.
सीबीआय चौकशीची मागणी
बबलू नवले हत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी कंजरसमाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची पुढील खटला चालविण्यासाठी नियुक्ती करण्यात यावी, मारेकर्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे. मयत बबलू नवले यांच्या परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे आदी घोषणा व फलकाद्वारे घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
मूकमोर्चात समाजबांधव उपस्थित
बबलू नवले याचा निष्पाप बळी गेला आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून राज्यभर मुकमोर्चा, मोटारसायकल रॅली, विविध पक्षातील आमदार, खासदार, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांना निवेदन देण्यात येत आहे. शहरातील जाखनीनगर कंजरवाडा, सिंगापूर कंजरवाडा, तांबापूर कंजरवाडा येथील समाजबांधव, महिलावर्ग, युवक मोठ्या संख्येने मुक मोर्चात सहभागी झाले होते. भर उन्हात मुकमोर्चाला अंधशाळेजवळून सुरुवात झाली. सुरुवातीला कै. बबलू नवले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मुकमोर्चा काढण्यात आला. पांडे डेअरी चौक ते स्वातंत्र्य चौक, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी निंबाळकर यांना निवेदन देवून मुकमोर्चाची सांगता
करण्यात आली.
किरकोळ वादातून घडली होती घटना
बबलू सुभाष नवले हा इचलकरंजी येथे त्यांच्या शालकाचा लग्न दि. 8 मे रोजी असल्याने लग्नाची पत्रिका वाटप करण्यासाठी इचलकरंजी येथे गेला होता. इचलकरंजी येथील त्याचा नातेवाईक रोहित सावंत नवले लग्नाची पत्रिका वाटप करताना त्याला सोबत घेतेल होते. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कबनुर चौकात एकाशी किरकोळ कारणावरुन वाद झाले असता बबलू नवले हा वाद सोडण्यासाठी गेला. त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. जखमी अस्वस्थेत असणार्या बबलू नवलेला 108 रुग्णवाहिकेद्वारे स्थानिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दि. 6 रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घोषणा वैद्यकीय अधिकार्यानी केली होती.