कंजरवाडा परिसरातील गावठी भट्टीचे अड्डे उद्ध्वस्त

0

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव : शहरातील कंजर वाडा परिसरातील सिंगापूर भागात एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी केलेल्या कारवाई केली . या कारवाईत पाच गावठी हात भट्टीची दारुच्या भट्टया उध्वस्त करण्यात आल्या असुन एकुण २ , ८५ , २५० रुपये किंमतीचे गावठी हात भट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे कच्चे व पक्के रसायन व गावठी हात भट्टी जागीच नष्ट करण्यात आले.

पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

कारवाईत अवैध गावठी हात भट्टी दारु तयार करणाऱ्या हिना सचिन बागडे , वय – २५ , रा – संजय गांधीनगर , इंदुबाई उदयसिंग बागडे , वय – ५० , रा – संजय गांधीनगर , राजेश वजीर माचरे , वय ४० रा – संजय गांधीनगर कंजरवाडा , नरगिस हिरा नेतले , वय – ३४ , अनिता सुधाकर बागडे , वय – ५० सर्व रा सिंगापुर , कंजरवाडा यांचेवर विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकाने केली कारवाई

उप विभागीय पोलीस अधिकारी , डॉ. निलाभ रोहन मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ , सहा . पोलीस निरीक्षक अमोल मोरे , पोलीस उप निरीक्षक विशाल वाठोरे , सहा . फौजदार अतुल वंजारी , सहा . फौजदार आनंदसिंग पाटील , पोहेकॉ हर्षवर्धन सपकाळे , पोहेकॉ मंदा बैसाणे , दिपक चौधरी , मिनाक्षी घेटे , अशोक सनगत , कळसकर , चंद्रकांत पाटील , इम्रान बेग , सतीष चिंचोले , सपना येरगुंटला यांच्या पथकाने ही कारवाई केली.