कामशेत : मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणारा कंटेनर (एमएच 46 एएफ 9664) रस्त्याच्या मधोमध उलटल्याने पुण्याकडे येणारी वाहतूक सुमारे तासभर धिम्या गतीने सुरु राहिली. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कामशेत खिंडीत झाला. या घटनेत कंटेनर चालक महादेव देसाई (रा. तासगाव, जि. सांगली) जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देसाई हा मुंबईहून पुण्याच्या दिशेने कंटेनर घेऊन येत होता. वेग जास्त असल्याने आणि कामशेत खिंडीतील उतारामुळे त्यांचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्या कंटेनरला (एमएच 06 के 6431) धडक बसून कंटेनर उलटला. अपघातग्रस्त वाहने अद्याप रस्त्यावर असल्याने या मार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरु होती. देसाई याच्या डोळ्याला किरकोळ मार लागला आहे.