कंटेनरची मालवाहू रिक्षेला धडक

0

वरणगाव। येथुनच जवळील ओमसाई हॉटेल समोर फुलगाव व वरणगाव दरम्यान वळणावर ओव्हरटेक करणार्‍या कंटनेनर ने समोरून येणारी मालवाहतूक करणार्‍या रिक्षेला धडक दिल्याने रिक्षा पलटी होवून एक ठार तर तीन जखमी झाल्याची घटना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. अवघ्या काही अंतरावरील पोलस स्टेशन मधुन घटनास्थळी पोलीसांना पोहचण्यास एक तास लागला. आल्यानंतर उपस्थित नागरीकांना पोलीसाने अर्वाच्य भाषेत बोलल्याने तणाव ग्रस्त स्थिती निर्माण होऊन महामार्ग तब्बल दोन तास ठप्प झाला होता. आजुबाजुच्या तालुक्यातून अतिरीक्क पोलीस कुमक मागविण्यात आली होती.

नागरीकांनी केली मदत
वाहनधारकांची होणारी कुचंबणा व हाल बघुन जमावातील काही नागरीकांनी शांततेची भुमीका घेत स्वत:हून महामार्गावरील वाहतुक सुरळीत केली. विलास मुळे, उल्हास भारसके, सुधाकर जावळे, संजय वायकोळे, प्रकाश कोळी,जितु राणे, किशोर कोळी, प्रमोद पाटील, रमेश धरणे आदिच्या सह्यानी निवेदन दिले. तोपर्यंत मुक्ताईनगर उपविभागीय अधिकारी सुभाष नेवे, भुसावळचे सहाय्यक पोलीस अधिक्षक निलोत्पल, भुसावळचे पोलीस निरीक्षक हेमंत कडूकार, मुक्ताईनगरचे अशोक कडलग, बोदवड, जळगाव येथील अतिरीक्क पोलीस कुमक व दंगानियंत्रक पथकाचे पाचारण वरणगाव पोलीस स्टेशनला झाले.

धडक दिल्याने रिक्षा पलटी
तळवेल येथील रिक्षा चालक गोकुळ अर्जन माळी वय 30, मोहन पाटील (वय 30), प्रभाकर उर्फ बाळू पुंजो पाटील (वय 55), रमेश बाबुराव झटके (वय 40) रा. पिंपळगाव बुद्रुक ता.भुसावळ हे रिक्षा क्रमांक (एमएच 19 बीए 4383) ने सकाळी तळवले येथुन बोअरींग रिपेअरींग करण्यासाठी खडका ता.भुसावळ कडे निघाले. साडे नऊ वाजेच्या सुमारास वरणगाव व फुलगाव दरम्यान ओमसाई हॉटल नजीक वळणावर कंटेनर क्रमांक डब्लुबी 23 डी 4247 हा भुसावळ कडून मुक्ताईनगर कडे जात असताना ओव्हरटेक करताना वळणावर रीक्षा अचानक समोर आली. कटेनरने जोरदार धडक दिल्याने रीक्षा पलटी होवून रीक्षेल मधील बोअरीग रिपेअरींगचे सामान बाळू उर्फ प्रभाकर पूंजो पाटील यांच्या अंगावर पडले. यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला तर उर्वरीत तिघे जखमी झाले. मोहन माळी यांच्या फिर्यादिवरून वरणगाव पोलिसात कंटेनर चालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस हेड कॉन्टेबलकडून आरेरावी
तर या घटनेची माहिती तात्काळ वरणगाव पोलीसांना देण्यात आली. तब्बल एक तास उलटून देखील पोलीस घटनास्थळी पोहचले नाही. तोवर तळवेल व वरणगाव च्या नागरीकांनीच वाहतुक दोन्ही बाजुची सुरळीत केली. एक तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. घटनास्थळाचा पंचनामा व जखमींना रूग्णालयात पोहचवण्या ऐवजी घटनास्थळी असलेल्या जमावाला अर्वाच्य भाषेत शिवागाळ गोपनीय खात्याचे पोलीस हेड कॉन्टेबल राहुल येवले यांनी केल्यामुळे जमाव संतापला. पोलीस व जमावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थीतीच गांभिर्यता ओळखून सहकारी पोलसानी राहुल येवले यांना घटनास्थळावरून पळविले. संतप्त जमावाने रिक्षेतील साहित्य व पाईप महामार्गावर टाकुन महामार्ग जाम केला. सदरच्या पोलीसाला निलंबीत करण्याची मागणी केली.