कंटेनरच्या धडकेत वढवेतील दुचाकीस्वार ठार

मुक्ताईनगर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर घोडसगाव ते चिखलीदरम्यान कंटेनरने दिलेल्या धडकेत वढवे (ता.मुक्ताईनगर) येथील हरी रघुनाथ पाटील (42) यांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. हरी पाटील हे दुचाकीने (क्रमांक एम.एच.19 डी.एन.2066) ने घराकडे जात असताना समोरून येणारा कंटेनर (क्रमांक एम.एच.04 जे.यू.4997) ने धडक दिल्याने हरी पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला. याप्रकरणी कैलास पाटील (रा.वढवे) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार संजय पाटील करत आहे.