घोडसगाव शिवारात अपघात ; कंटेनर चालक पसार
मुक्ताईनगर :- पादचारी कामगाराचा भरधाव कंटेनरने धडक दिल्याने मृत्यू झाला. सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात घोडसगाव शिवारातील साखर कारखान्याजवळ घडली. अण्णा बाबूराव बेंद्रे (65, रा.मुळव्हा, ता.उंबरखेड, जि.यवतमाळ) असे मयत कामगाराचे नाव आहे.
बेंद्रे हे घोडसगाव शिवारातील संत मुक्ताई शुगर एनर्जी प्रा.लि. या सहकारी कारखान्यात कामगार असून ते सकाळी बर्हाणपूर चौफुजीकडे पायी जात असताना बर्हाणपूरकडे जाणारा भरधाव कंटेनरने त्यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी भिकाजी कोल्हे (रा.घोडसगाव) यांनी मुक्ताईनगर पोलिसात खबर दिल्यावरून कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला असूला चालक मात्र पसार झाला. तपास सहाय्यक फौजदार माणिक निकम करीत आहे.