दोंडाईचा- भरधाव कंटेनरने धडक दिल्याने हरणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास निमगुळ रस्त्यावर घडली. पाण्याच्या शोधार्थ हे हरीण रस्त्यापलिकडे जात असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, दोंडाईचा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत धडक देणार्या कंटेनरसह चालकाला ताब्यात घेतल. वनरक्ष मुकेश गुजर यांनी घटनास्थळी भेट दिली.