कंटेनरच्या धडकेने बसमधील चालकासह चौघे जखमी

Rushing Container Collides with ST bus in Raver : Four Injured Including Bus Driver रावेर : रावेरकडून जळगावकडे जाणार्‍या बसला समोरून येणार्‍या कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील चालकासह चौघे प्रवासी जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. हा अपघात मंगळवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास रावेर शहरापासून तीन कि.मी. अंतरावर डॉ.संदीप पाटील यांच्या शेताजवळ झाला.

कंटेनर चालकाविरोधात गुन्हा
जळगाव आगाराची रावेर-जळगाव बस (एम.एच.40 एम.9834) ही रावेर येथून जळगावकडे रवाना झाल्यानंतर सावद्याकडून भरधाव वेगाने येणारा कंटेनर (डी.डी.एम.9432) ने धडक दिली. या अपघातात पिंटू बारेला (26), अंजली पिंटू बारेला (20) व कार्तिक पिंटू बारेला (3, तिन्ही रा.न्हावी, ता.यावल) या एकाच कुटुंबातील तिघांना दुखापत झाली तर बस चालक बापू बाबूराव कोळी (48, कांचनगर, जळगाव) जखमी झाले. बस चालक कोळी यांच्या तक्रारीनुसार कंटेनर चालक शहाजत कलम खान (दिलदार नगर, जि.जमानिया, गाझीपूर, उत्तरप्रदेश) याच्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक अतुल तडवी करीत आहेत.