कंटेनरमधून चोरट्यांनी पार्सल लांबवले : नशिराबाद टोल नाक्याजवळील घटना

भुसावळ/जळगाव : तालुक्यातील नशिराबाद टोल नाक्याजवळ कंटेनरमधून अज्ञात चोरट्यांनी 15 हजार 800 रुपये किंमतीचे पार्सल चोरुन नेले. याबाबत कंटेनर चालकाच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांचा पोलिसांकडून शोध
मालेगाव ते नशिराबाद दरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर क्रमांक (एम.एच.01 ए.सी.0157) हे रविवार, 13 फेब्रुवारी रात्री 10 ते 14 फेब्रुवारी रात्री दोन दरम्यान महामार्गावरून भुसावळकडे जात असताना कंटेनर नशिराबाद येथे आल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी कंटेनरमध्ये असलेले स्टाँटन कंपनीचे 15 हजार 800 रुपये किंमतीचे पार्सल लांबवले. ही कंटेनर चालकाच्या लक्षात आल्यानंतर कंटेनर चालक रंजनकुमार लालदेव पासवान (28, रा.चंद्रहता, केरप, रफिगंज, बिहार) यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुरुवार, 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल भाग्यश्री चौधरी करीत आहे.