कंटेनरला आग; वावडदा जवळील घटना

0

नांद्रा । येथून जवळ असलेल्या वावडदा रस्त्यावर एलजी कंपनीचे फ्रीज भरून जाणार्‍या कंटेनरला अचानक आग लागल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावातील नागरीकांना एक धाव घेवून अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले. यावेळी जळगाव महानगरपालिका आणि जैन इरिगेशन असे दोन अग्नीशमन बंब दाखल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एंरडोलकडून जामनेर कडे जाणार्‍या कंटेनर (एचआर-38 आर 7960) मध्ये एलजी कंपनीचे फ्रिज भरून जात असतांना वावडदा येथील चौफुलीच्या जळगाव कडे जाणार्‍या वळणावर कंटेनरने अचानक दुपारी 2 वाजेला आग लागली. कंटेनरला लागलेली आग पाहून चौकात उपस्थित नागरिकांना तात्काळ जैन इरिगेशन आणि जळगाव महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागात संपर्क साधुन पाचारण करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार अजूनही आग विझविण्याचे काम सुरू होते. दरम्यान या अगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.