भुसावळ : भरधाव कंटेनर व लक्झरीमध्ये धडक होवून झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर दहा प्रवासी जखमी झाले. राष्ट्रीय महामार्गावरील कपिलवस्तू नगराजवळ शनिवार, 3 रात्री 12.10 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात प्रकरणी कंटेनर चालकाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघातातील ट्रॅव्हल्समधील सैय्यद अकबर सैय्यद उस्मान (50, मिठी खाडी, सुरत) या प्रवाशाचा मृत्यू झाला तर अन्य दहा प्रवासी जखमी झाले. अपघात प्रकरणी सैय्यद फारूख सैय्यद उस्मान (रा.मिठी खाडी, सुरत) यांच्या फिर्यादीनुसार कंटेनर चालक कुलदीपसिंग यांच्याविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.