भुसावळ- तालुक्यातील कंडारी येथील इसमाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. सुरेश बाळू परदेशी (40, महादेव मंदिराजवळ) असे मयताचे नाव आहे. रेल्वेच्या पीओएच यार्डात यार्डात गाडीखाली आल्याने कापले गेल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. परदेशी यांचा मृतदेह भुसावळ पालिकेच्या रुग्णालयात आणल्यानंतर डॉ.संदीप इंगळे यांनी मृतदेह जळगाव येथे विच्छेदनासाठी हलवला. दरम्यान, लोहमार्ग पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत नोंद नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.