भुसावळ- तालुक्यातील कंडारी येथील कंडारी हनुमान मंदिराजवळ शाळेत जाणार्या अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयीत मो.ईरफान मो.हुसेन (ग्रीन पार्क, एकता कॉलनी बोर्डाजवळ, खडका रोड, भुसावळ) विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीत 14 वर्षीय बालिका शाळेत जात असताना संशयीत आरोपी मो.ईरफान हा दुचाकी (एम.एच.19 बी.एफ.6484) वर आला व त्याने बालिकेचा विनयभंग केला. बुधवार, 11 रोजी सकाळी 11.30 वाजता ही घटना घडली. तपास शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक के.टी.सुरळकर करीत आहेत.