कंडारीत गळफास घेऊन हातमजुराची आत्महत्या

0

भुसावळ। तालुक्यातील कंडारी येथे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार 8 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. महिना भरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याची ही तिसरी घटना आहे.

कंडारी येथील महादेव टेकडी परिसरातील रहिवासी असलेल्या धीरज मधुकर भडांगे (वय 48) यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार पहाटे 4 वाजता उघडकीस आला. याबाबत अभिमन्यु भडांगे यांनी खबर दिल्यावरुन शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. तपास प्रभारी पोलीस निरीक्षक एम.एम. मुळूक यांच्या मार्गशर्नाखाली पोलीस कॉन्स्टेबल वसंत लिंगायत हे करीत आहे. दरम्यान महिनाभरात याच भागात गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या दुसर्‍या घटनेला आठवडा होत नाही तोच तिसरी घटना घडली.