कंडारीत जुगार अड्ड्यावर धाड

0

भुसावळ । तालुक्यातील कंडारी येथे महादेव टेकडी परिसरात टपरीच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीसांनी रविवार 21 रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास अचनाकपणे धाड टाकली. यात 9 आरोपींसह 1 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी मुक्ताईनगर तालुक्यातील जुगार अड्डयावर पोलीसांनी छापा मारुन 32 जणांना अटक केली आहे. अवैध धद्यांना उत आल्याचे यावरुन दिसते. कंडारी गावात सुरु असलेल्या जुगार अड्ड्याची माहिती पोलीसांना मिळाल्यावरुन केलेल्या कारवाईत संजय मुरलीधर मोरे (वय 44, रा. महादेव टेकडी, कंडारी), एट्रो ब्रायन सिमन्स् (वय 27), अनिल प्रकाश सपकाळ, शेख मेहबुब शेख गुडन, रवि तुकाराम तायडे, संदीप अशोक प्रजापती, अशोक शामराव दमाडे, गौतम रंगनाथ देवरे, प्रविण रघुनाथ महाजन यांना पोलीसांनी अटक केली आहे. यामध्ये 2 हजार 300 रुपये रोख, जुगार कार्ड, दहा मोबाईल संचासह इतरही साहित्य असे एकूण 1 लाख 4 हजार रुपये किंमतीचा मद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल समाधान पाटील यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक अंगत नेमाणे करीत आहे.