कंडारीत टीव्हीचा शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू

0

भुसावळ- तालुक्यातील कंडारी येथील आकाश विजय बनसोडे (24) या युवकाचा घरातील वीज टीव्हीचे कनेक्शन तपासताना विद्युत शॉक लागला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. शहर पोलिसात विजय बनसोडे यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार महेंद्र ठाकरे करीत आहेत.