कंडारी मारहाण प्रकरण ; चौघांविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ- मुलाशी झालेल्या वादाच्या कारणातून तालुक्यातील कंडारी गावातील वखारीजवळील रहिवासी सुमनबाई आत्माराम मोरे (45) यांच्या घरात घुसून आरोपींनी लोखंडी पाईपाने मारहाण करीत घराचे नुकसान केल्याची घटना 22 रोजी रात्री 11.30 वाजता घडली होती. या प्रकरणी शहर पोलिसात सुमनबाई मोरे यांनी गुरुवारी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी आकाश खेडक्र, हेमंत भालेराव, संदीप सिंगारेचा भाचा गोलू (पूर्ण नाव माहित नाही) व गोलू देवरे (कंडारी प्लॉट) यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी मुलाशी झालेल्या वादाच्या कारणातून घरात अनधिकृतपणे प्रवेश करीत लोखंडी पाईपाने पायावर तसेच कंबरेजवळ मारहाण करून घराचे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपींच्या धुडगुसामुळे घरातील सामानाचे 15 ते 20 हजारांचे नुकसान झाले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश कोळी करीत आहेत.