कंडारी येथे पायाभूत सुविधा उभारण्याची मागणी

0

भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथील अल्पसंख्यांक बहुल भागात पायाभूत सुविधा यांसह सामाजिक सभागृह उभारण्यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनातर्फे गटविकास अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.

यात नमूद करण्यात आले की, कंडारी येथे सामाजिक सभागृहासाठी दहा लाखांची रक्कम करण्यात आली होती मात्र नंतर ही पाच लाखांची मंजुरी करण्यात आली आहे. तरी ही रक्कम कमी का करण्यात आली, याची शहानिशा करुन ती वाढवून मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा 15 दिवसांनी ग्रामपंचायत सदस्य व अल्पसंख्यांक समाजबांधव उपोेषण करतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षर्‍या
या निवेदनावर केदु पवार, एस.एच. वाकेकर, एस.आर. वासनिक, सुर्यभान पाटील, शामराव मोरे, एस.एस. तायडे, विशाल खेडकर यांच्या स्वाक्षर्‍या आहे.